कृषी उत्पन्न बाजार समिती, खेड राजगुरुनगर, जिल्हा: पुणे.
चाकण उप बाजाराची स्थापना ३० एप्रिल १९५९ मध्ये झाली. चाकण उपबाजार आवाराकरिता ९ एकर २४ गुंठे जागा आहे. सदरील जागा वाढत्या शेतीमाल आवकेमुळे कमी पडत असल्यामुळे व तसेच जनावरांच्या वाढत्या बाजारामुळे, समितीने स्वतंत्र जनावरांच्या बाजाराकरिता अर्धा किमी अंतरावर रोहकल रस्त्यावर नवीन ७ एकर २० गुंठे जागा सन १९८५ मध्ये खरेदी केलेली आहे.
चाकण उपबाजार आवारामध्ये कांदा, बटाटा, भु.शेंग व लसूण इत्यादि खरेदी विक्रीचे व्यवहार बुधवार व शनिवार या दिवशी होतात. तसेच यार्डवर दैनंदिन सकाळचा बाजार भरत असतो
दर शनिवारी चाकण उपबाजार आवारामध्ये जनावरांचा आठवडा बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरतो.
शेलपिंपळगाव उप बाजाराची स्थापना ६ एप्रिल १९७९ मध्ये झाली. शेलपिंपळगाव उपबाजार आवाराकरिता ६ एकर ३५ गुंठे जागा आहे.
शेलपिंपळगाव यार्डवर ६ सप्टेंबर १९९७ पासून पिंपळगाव, भोसे, शेलगाव, वडगाव घेणंद, रासे, कोयाळी, बहुळ, चिंचोशी, सिद्धेगव्हाण इत्यादी परीसरातील शेतकऱ्यांच्या सोयीकरिता भाजीपाल्यांचा दैनंदिन संध्याकाळचा बाजार सुरू केला होता.
पाईट उप बाजाराची स्थापना १५ जुलै १९८६ साली झाली. पाईट उपबाजार आवाराकरिता 3 एकर जागा घेतलेली असून दिनांक २८/०८/२००० रोजी सदरच्या जागेचे खरेदीखत करून घेतले आहे. तसेच दिनांक १३/१०/२०१० रोजी २ एकर जागेचे खरेदी खत केलेले असून अशी एकूण ५ एकर जागा समितीच्या मालकीची आहे
पाईट उपबाजार आवारात समितीने दिनांक १५/०२/२०१४ पासून पेट्रोल पंप सुरू केला आहे.
वाडा उप बाजाराची स्थापना २२ ऑगस्ट १९८६ साली झालेली आहे.
कडे बु. उपबाजार आवाराची स्थापना १५ डिसेंबर २००० साली झाली.
कडे बु. उपबाजार आवारा करिता समितीने २ एकर १५ गुंठे जागा दिनांक १२/०१/१९९८ मध्ये खरेदी केलेली आहे
डेहणे उपबाजार आवाराची स्थापना १५ डिसेंबर २००० साली झाली.
डेहणे उपबाजार आवारा करिता समितीने १ एकर १७ गुंठे जागा दिनांक १३/०६/२००० मध्ये खरेदी केलेली आहे. तसेच दिनांक १३/०६/२०१० रोजी सर्वे नं १३१(३) मधील २९ गुंठयाचे साठेखत समितीने केले आहे. एकूण २ एकर ६ गुंठे जागा समितीच्या ताब्यात आहे.
डेहणे गावात रस्त्यावर भरणारा आठवडा बाजार ६ जून २०१३ पासुन उप बाजार आवारात भरत आहे.