स्थापना व इतिहास

कृषी उत्पन्न बाजार समिती खेड ची स्थापना दिनांक १६/०८/१९५० रोजी झाली.

शेतीमालास योग्य भाव मिळावा व व्यापाऱ्यांकडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक थांबावी या उद्देशाने "दि बॉम्बे ऍग्रिकल्चर प्रोड्यूस ऍक्ट १९३९" हा कायदा पास केला गेला. त्या अन्वये सरकारने जाहीर प्रगटन क्रमांक १७२ दिनांक १६/०८/१९५० अन्वये हा कायदा खेड तालुक्यास लागू केला व त्या नुसार "कृषी उत्पन्न बाजार समिती खेड" ची स्थापना झाली.

१९६० साली स्वतंत्र महाराष्ट्राची स्थापना झाल्याने पुढे मुळ कायद्यात सुधारणा करून स्वतंत्र महाराष्ट्र राज्यासाठी एकच मार्केट ऍक्ट म्हणजे "कृषि उत्पन्न खरेदी विक्री(नियमन) अधिनियम १९६३" हा करण्यात आला. या कायद्याच्या नावात सन २००७ मध्ये बदल होऊन "महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी-विक्री(विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व नियम १९६७" असे करण्यात आले.

बाजारसमितीचे कार्यक्षेत्र
बाजारसमितीचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण खेड तालुका असून कार्यक्षेत्रातील एकूण महसुलाच्या गावांची संख्या १८९ आहे.