सुविधा उपक्रम

भाजीपाला शेड

मुख्य बाजार आवार खेड, राजगुरूनगर येथे ४०० x ३० साइज चे ३१ गाळ्यांचे शेडचे बांधकाम केलेले आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची प्रत चांगली राहते व ऊन, पाऊस चिखल यापासून संरक्षण होते.
तसेच तरकारी या शेतीमालासाठी ऑफिस च्या दक्षिण बाजूस आडत्याकरिता १०० x ४४ फुट साइज शेड चे बांधकाम केलेले आहे.

भुईकाटा

बाजार समितीने व्यापारी व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ४० टनी वजनाचा भुईकाटा बसविलेला असून तो २४ तास चालू आहे.

व्यापारी संकुल

खेड मार्केट यार्ड वर समितीने व्यापारी संकुल इमारतीमध्ये तळमजल्यावर ३३ व्यापारी गाळ्यांचे बांधकाम केलेले आहे. पहिल्या मजल्यावर बँका, पतसंस्था यांच्याकरिता ५ हॉल चे बांधकाम केलेले आहे. तसेच दुसऱ्या मजल्यावर एक मोठा सभा हॉल , संचालक मंडळ सभागृह, सभापती व उपसभापती ऑफिस, गेस्ट रूम, शेतकरी निवास , सचिव ऑफिस व स्टाफ रूम इत्यादि सुविधा आहेत.

भारतीय स्टेट बँक

भारतीय स्टेट बँकेच्या राजगुरूनगर शाखेसाठी व्यापारी संकुल व प्रशासकीय इमारतीच्या पाठीमागे स्वतंत्र इमारत भाड्याने दिलेली आहे.

बाजारसमितीचे संगणकीकरण

मार्कनेट प्रकल्पा अंतर्गत बाजारसमितीला डायरेक्टर ऑफ मार्केटिंग अँड ईन्सपेक्षण (डी. एम. आय.) फरीदाबाद यांच्याकडून राजगुरूनगर मुख्य बाजार , चाकण व शेल पिंपळगाव उप बाजार येथे संगणक , मोडेम , प्रिंटर, यू. पी. एस. इत्यादि सामुग्री अनुदानाच्या स्वरूपात महाराष्ट्र कृषि पणन मंडळाच्या सहकार्याने मिळाली आहे.

केंद्र शासनाची ई-नाम योजना राजगुरूनगर यार्ड वर सुरू असून या अंतर्गत शेतमालाची, शेतकऱ्यांची गेट एंट्री ई-नाम पोर्टल वर होत आहे. ई-नाम प्रणाली अंतर्गत लोट्स मॅनेजमेंट, शेतमालची गुणवत्ता तपासणी, ई-लिलाव, ऑनलाइन पेमेंट इत्यादि सुविधा आहेत.

गांडूळ खत प्रकल्प

बाजार समितीने फुले मार्केट यार्ड चाकण येथे गांडूळ खत प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पातून उत्पन्न होणारा गांडूळ खत शेतकऱ्यांना ७/१२ पाहून सवलतीच्या दरात म्हणजे रक्कम रुपये २००/ - बॅग प्रमाणे विक्री केला जात आहे.

बाजार माहिती केंद्र

बाजार समितीने कृषि उत्पन्नावर आधारित उद्योगाना चालना देण्यासाठी बाजार समिती माहिती केंद्राची स्थापना केलेली आहे. या केंद्राचा उद्देश शेतकरी, उद्योजक, निर्यातदार याना कृषि क्षेत्रात उच्च तंत्रज्ञानाचा वापर देशांतर्गत , आंतरराष्ट्रीय बाजारपेठातील शेतीमालाचे बाजारभावातील चढ-उतार कृषि पणन विषयक माहिती एकच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा आहे.

ग्रामीण गोदाम योजना

बाजार समितीने सन १९८१-८२ मध्ये नॅशनल ग्रीन गोडाऊन स्कीम खाली चाकण व शेल पिंपळगाव यार्डवर एक हजार मे. टन क्षमतेचे गोडाऊन बांधली आहेत. तसेच डेहणे उपबाजार येथे गोदामची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे शेतीमालाच्या साठवणुकीची सोय होणार आहे.

शेतकरी प्रशिक्षण

पणन मंडळाचे हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर तळेगाव दाभाडे येथे हरितगृह शेतकऱ्यांना प्रशिक्षण केंद्र सुरू झालेले आहे. सदरील केंद्रा मध्ये आतापर्यंत ७१ शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. बाजारसमितीच्या वतीने हरितगृह (पॉलीहाऊस) व्यवस्थापन प्रशिक्षणासाठी प्रत्येक शेतकऱ्याला एक हजार रुपये अनुदान देऊन प्रशिक्षणासाठी पाठविले जाते. सदरील शेतकऱ्याला ५ दिवसाचे प्रशिक्षण दिले जाते.